Share

खाकीला काळीमा! ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकरने घेतले दोन लाख

Published On: 

जालना : पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.२०) दुपारी जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर अशोक खिरडकर (रा.ऋषीपार्क,जालना) यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी विठ्ठल पुंजाराम खार्डे (रा. कडवंची) व कदीम जालना ठाण्याचे पोलीस नाईक संतोष अंभोरे यांना दोन लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले.

या प्रकरणातील तक्रारदारावर दाखल ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी खिरडकर यांनी पोलीस नाईक अंभोरे याच्यामार्फत पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती तीन लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केले होते. या कारवाईमुळे जालना पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार उच्चपदस्थ अधिकारी असून, त्यांच्या जवळच्या नातेवाइकावर काही दिवसांपूर्वी शेतीच्या वादातून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्याचा तपास जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर हे करत आहेत. दरम्यान, गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकर याने तक्रारदाराकडे पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडअंती तीन लाख रुपये स्वीकारण्याचे कबूल केले.

पण लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी थेट पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुण्याच्या पथकाने दि. १८ व १९ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यानंतर पथकाने गुरुवारी दुपारी कडवंची-अंबुरेवाडी येथे सापळा लावून पोलीस नाईक संतोष निरंजन अंभोरे (४५) यास दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!