नंदुरबार: केंद्र सरकारने तब्बल १४ हजार ७७५ कोटींच्या खत अनुदानाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना राज्य सरकारने खत सुलभतेने उपलब्ध होईल याची व्यवस्था करून, शेतकऱ्यांना खरीप हंगामातील मशागतीच्या कामांसाठी दहा हजार रुपयांचे सरसकट रोख अनुदान तातडीने द्यावे, अशी मागणी भाजप खासदार हिना गावित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत खतांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना खत दरवाढीपासून दिलासा देणारे धोरणच आखले गेले नव्हते. केंद्र सरकारने खतावरील अनुदान १४० टक्क्यांनी वाढवून शेतकरी हिताचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी दहा हजारांचे रोख अनुदान जाहीर करावे.
दरवर्षी काळाबाजार, साठेबाजी आणि आर्थिक अडवणूक यामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेएवढे खत राज्यात उपलब्ध होत नाही. गेल्या वर्षीही खताच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी भरडला गेला होता. तशी वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने खत वितरणाची प्रणाली आखून द्यावी, तसेच खताचा काळाबाजार रोखणारी यंत्रणा तातडीने उभी करावी अशा मागण्या या प्रसिद्धी पत्रकाद्वारे गावित यांनी राज्य सरकारकडे केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘मोदी पंतप्रधान आहेत म्हणून देश वाचला, काँग्रेसचा असता तर..’
- अक्षय कुमारच्या मदतीने मराठवाड्यात पहिली मोबाईल आरटीपीसीआर टेस्ट व्हॅन उपलब्ध
- खाकीला काळीमा! ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी डीवायएसपी खिरडकरने घेतले दोन लाख
- खतांची दरवाढ मागे; ‘केंद्राचा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा’, प्रीतम मुंडेंकडून स्वागत
- ‘..त्यामुळेच माध्यमांकडून मुख्यमंत्री ठाकरेंचा पाठलाग सुरू’, भाजप नेत्याचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
