🕒 1 min read
रायपूर : पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे नाव रावळपिंडी येथील एका क्रिकेट स्टेडियमला देऊन त्याचा सन्मान केला गेला आहे. पाकिस्तानच्या सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला शोएब अख्तर याचे नाव प्रसिद्ध मैदानावर देण्यात आले. रावळपिंडी येथील खान रिसर्च लॅबोरेटरीजच्या केआरएल स्टेडियमचे नामकरण आता ‘शोएब अख्तर क्रिकेट स्टेडियम’ असे करण्यात आले आहे. या मैदानाचा वापर सर्व खेळांसाठी केला जातो. या मैदानाची प्रेक्षक क्षमता ८००० इतकी आहे.
https://twitter.com/shoaib100mph/status/1370675554496708610?s=20
केआरएल स्टेडियमचे नामकरण आपल्या नावे केल्यानंतर शोएबने ट्विटरवरून आभार मानले. त्याने ट्विट करत लिहिले, ‘माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्याकडे सध्या शब्द नाहीत. इतक्या वर्षात जे प्रेम आणि सन्मान मला मिळाला आहे, ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’
अख्तरने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मी पुर्ण इमानदारीने आणि निष्ठेने देशाची इतकी वर्ष सेवा करत, देशाचा झेंडा उंचावण्याचा प्रयत्न केला. मी रोज अभिमानाने छातीवर पाकिस्तानचा स्टार लावू शकतो. धन्यवाद’.
महत्त्वाच्या बातम्या
- आलिया भट्टची रणबीर कपुरच्या आठवणीत भावनिक पोस्ट
- ‘एमपीएससी परिक्षा २१ मार्च रोजी, सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा’
- नागरी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्याकडून पाहणी
- शाळेच्या अनुदानासाठी १४० कोटीच्या निधीस मंजुरी : वर्षा गायकवाड
- महिलांचा आर्थिकस्तर उंचाविण्याचा जीवनज्योती अभियानातून प्रयत्न-मंगेश गोंदावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

