Share

“हे सरकार ५ वर्ष टिकणार आणि विरोधकांना…”, उदय सामंत यांचा दावा

Published On: 

रत्नागिरी : पाच राज्यांच्या निवडणूक निकालात पंजाब वगळता चार राज्यात भाजपला दणदणीत विजय प्राप्त झाला असून भाजपला टक्कर देण्यासाठी गोवा आणि उत्तर प्रदेशात उमेदवार उतरवणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तसेच या मुद्द्यावरून भाजप नेत्यांकडून विरोधकांवर निशाणा साधण्यात येत आहे. असे असतांनाच महाराष्ट्रातील सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं, असे वक्तव्य काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी केले आहे. दरम्यान, कुमार केतकर यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना उदय सामंत म्हणाले की,‘महाविकास आघाडी सरकार स्थिर असून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी एकत्र असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काहीही धोका नाही.’ तसेच हे सरकार ५ वर्ष टिकणार आणि विरोधकांना अजून १५ वर्ष विरोध करण्याची संधी मिळणार, असेही सामंत म्हणाले.

दरम्यान, पुढे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस संदर्भात विचारण्यात आले असता उदय सामंत म्हणाले की,‘मी माझ्या मतदार संघातील काही कामांमध्ये व्यस्त होतो. त्यामुळे फडणवीस यांना दिलेल्या नोटीसबद्दल मला माहिती नाही. मी पूर्ण माहिती घेऊन बोलेन’, असे सामंत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!