Share

‘सरकार दोन पाऊल पुढं आलं असतं तर तोडगा निघाला असता’

Published On: 

मुंबई: राज्याच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाला २२ डिसेंबर पासून सुरुवात झाली आहे. २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. विधिमंडळात विरोधी पक्षावर बसलेल्या भाजपा नेत्यांनी विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला घेरले. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे आकडे स्पष्ट करत ठाकरे सरकारवर टीका केली. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी ट्वीत करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘चारशे एसटी कर्मचारी आपल्याला सोडून गेले. ही परिस्थिती सहानूभूतीने हाताळली असती तर ही वेळ आली नसती. दोन पाऊल सरकार पुढं आलं असतं तर तोडगा निघाला असता. प्रशासकीय पातळीवरचा भ्रष्ट्राचार थांबवा. सरकारनं आडमुठी भूमिका न घेता कारवाई करावी.’ अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी ट्वीत करत केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने अचानक जन्म घेतला नाही. तर धुळ्यातील कमलेश बेडसे या कर्मचाऱ्याने पगार मिळत नसल्याने आत्महत्या केली. तर नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीमधील एका चालकाने आणि जळगाव मध्ये एका कंडक्टराने आत्महत्या केली. त्यामुळे पगार न होणे, मदत न मिळणे यामुळे हा संताप उभा राहिला. खरे तर ६ हजार कर्मचारी निवृत्त झाले, पण त्यांना मदत मिळाली नाही. तर ४०० कर्मचारी जग सोडून गेले. खरे तर हे प्रकरण सरकारने सहानीभूतीने हाताळले असते, तर ही परिस्थिती आली नसती. विलिनीकरणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री दोन पाऊले पुढे आले असते. तर हा संप चिघळला नसता, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!