मुंबई : विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर या जागेवर महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचा नेता विराजमान होणार यावरून अनेक कयास बांधले जात आहेत. राज्यात सरकार स्थापन करताना हे पद कॉंग्रेसच्या पदरात पडले होते.
नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर हे पद आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना खुलं झाल्याचं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतर पवारांनी काँग्रेस याबाबत निर्णय घेईल असा खुलासा केला होता. अद्यापही अध्यक्षपद हे रिक्त असून विधानसभेच्या येत्या अधिवेशनाच्या आत नव्या अध्यक्षांची निवड गरजेची आहे. महाविकास आघाडीकडे दुसरा पर्याय आहे. तो म्हणजे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन चालवावं.
विधानसभा अध्यक्ष निवडीवरून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘या सरकारकडे प्रचंड बहुमत आहे तरी हे सरकार का घाबरत आहे ?’ असा सवाल त्यांनी केला आहे. ‘आपल्याच आमदारांना एवढं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहतोय’ असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला. ‘राज्यपाल हे विधानसभेच्या अध्यक्षाच्या नेमणुकीबाबत तारीख ठरवतील असं महाराष्ट्राचीच्या नियमावलीत नमूद आहे. राज्यपालांना तारीख ठरवण्याचा अधिकार आहे पण त्यांनी देखील याबाबत राज्य सरकारला मुभा दिली आहे.’ असं ते म्हणाले.
तर, ‘त्यांचा आपल्याच आमदारांवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे काही झालं तर आपलं सरकार पडेल का, अध्यक्ष पडेल का ? अशी भीती त्यांना वाटत आहे. चंगलंय , सरकारवर अंकुश राहील व त्यामुळे सत्ताधारी पक्षांतील आमदारांचा भलं होईल,’ अशी टिप्पणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- IPLAuction2021: क्रिस मॉरिससाठी लागली तब्बल १६.२५ कोटींची बोली !
- हे शिवभक्तांचं सरकार आहे, त्यांनी नको ती नाटकं करू नये – मंत्री सुभाष देसाई
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालता मग…वशाटोत्सव आणि साहित्य सम्मेलनही रद्द करा – संभाजी ब्रिगेड
- ‘अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का?’


