🕒 1 min read
पुणे- महाराष्ट्रात (19 फेब्रुवारी) निमित्त शिवजयंती चे हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाचे हजारो कार्यक्रम आयोजित करतात. गावागावात व्याख्यान, पोवाडे, स्पर्धा, प्रबोधनाचे इतर कार्यक्रम हे लाखो रुपये खर्च करून आयोजित करतात. कार्यक्रम पत्रिके पासून सभागृह आणि वक्त्याच्या मानधनात तोपर्यंत सगळे (बुकिंग) कार्यक्रम ठरलेले असताना सरकारने अचानक शिवजयंतीच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याचा आदेश काढला. त्यामुळे हजारो शिवप्रेमींचे लाखो रुपये पाण्यात गेले. हा शिवद्रोही सरकारचा दुर्दैवी निर्णय होता अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
शिंदे म्हणाले,नाशिक येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार ५० लाख रुपये देणार आहे. मंत्री छगन भुजबळ स्वागताध्यक्ष असल्यामुळे त्यांनी नाशिक मनपा व जिल्हा परिषद यांना प्रत्येकी 50 व 25 लाख रुपयांची दबाव टाकून मागणी केलेली आहे.ज्या महात्मा फुलेंनी अखिल भारतीय साहित्य संमेलनाला भटा-बामणांचे संमेलन आहे, इथे आमच्या लोकांचे प्रश्न सुटत नाही, त्यांची चर्चा होत नाही… अशा संमेलनाला आम्ही जात नाहीत…अशी भूमिका घेतली होती, अशा साहित्य संमेलनाला ते आमंत्रण असून सुद्धा गेले नाहीत…त्याच महात्मा फुले यांच्या नावाने ‘समता परिषद’ काढून छगन भुजबळ महाराष्ट्रात काम करतात आणि या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष केल्यानंतर माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंद आहे…अशी जाहीर चर्चा करतात, हा फुलेंच्या विचारांचा पराभव आहे.
साहित्य संमेलनाचा 50 लाख रुपये अनुदान राज्यातील जनतेच्या आरोग्यावर खर्च करावे. आम्ही शिवप्रेमी कार्यकर्ते फुले यांच्या विचारांचा पराभव होऊ देणार नाहीत. उलट गावागावात जाऊन शिवराय-फुले- शाहू -आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करू…!! म्हणून महाराष्ट्र सरकारने Covide-19 अर्थात कोरोनाचे वाढते संकट लक्षात घेता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन रद्द करावे अशी संभाजी ब्रिगेड ची भूमिका असे ते म्हणाले.
दरम्यान,पुण्यात येत्या शनिवारी वशाटोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वशाटोत्सव आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. शिंदे यांनी ‘वशाटोत्सव’ सुद्धा रद्द करण्याची मागणी केली आहे.
खा.शरद पवार,खा.संजय राऊत, मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असलेला चांदणी चौकातील (20 तारखेला) 1000 लोकांचा ‘वशाटोत्सव’ सुद्धा महाराष्ट्र सरकार व पुणे पोलिसांनी रद्द करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे असे ते म्हणाले. त्या तिथे ठिकाणी सुद्धा हजारो लोक जमणार आहेत. जर शिवजयंती उत्सवाचे राज्यातील कार्यक्रम रद्द होत असतील तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व वशाट उत्सव आणि इतर कार्यक्रम सुद्धा इथून पुढच्या काळातील रद्द झाले पाहिजेत… अशी संभाजी ब्रिगेडची ठाम भूमिका आहे असे ते म्हणाले.
एकीकडे कोरोना पुन्हा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारकडून केलं जात आहे. मग राष्ट्रवादीच्या वशाटोत्सवाला परवानगी कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबातील निकालांमुळे भाजपला धक्का; अमित शहांनी घेतली तातडीची बैठक
- पूजा चव्हाण प्रकरणातील संजय राठोड यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
- ‘मौत का कुआँ’ बनलेल्या ‘त्या’ विहिरीजवळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचेही काम सुरू
- शुद्धीवर न आलेल्या महिलेची आखेर ओळख पटली; गुढ मात्र कायम
- ‘चिनीसैन्य माघार घेत असल्याचा उत्सव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेची बनवाबनवीच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
