Share

हे शिवभक्तांचं सरकार आहे, त्यांनी नको ती नाटकं करू नये – मंत्री सुभाष देसाई

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना आटोक्यात आल्यामुळे राज्यभरात शिवजयंती दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोना पुन्हा एकदा बळावत असल्याचं कारण देत शिवजयंतीवर ऐनवेळी निर्बंध घालण्यात आल्याने भाजप, मनसेसह इतर संघटनांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

तर दुसरीकडं, विविध पक्षांचे मोर्चे, आंदोलने सर्रास सुरु असल्याचं दिसून आलं आहे. यामुळे शिवभक्तांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सरकारवर टीका शिवसेना नेते व मंत्री सुभाष देसाई यांनी देखील विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘शिवसेनेने भिवंडीतील बंद पडलेला शिवजयंती उत्सव चालू करून दाखवला.’ असं त्यांनी आवर्जून सांगितलं.

तर, ‘कोरोना हा अजून पूर्णपणे गेलेला नाही. हजारो लोकं या रोगाला बळी पडली. हे निर्बंध खबरदारी म्हणून आहेत. शिवजयंतीला कोणी विरोध कसा करू शकेल ? शिवभक्तांचं सरकार असल्यामुळे शिवजयंतीला विरोध नाही तर सावध होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कोणीही नको ती नाटकं करू नयेत,’ असा टोला देखील सुभाष देसाई यांनी लगावला आहे.

‘प्रदेशाध्यक्षांच्या मिरवणुकीला कोरोना नसतो मात्र शिवजयंती वेळी कोरोना समोर येतो !’

दरम्यान, ‘‘प्रदेशाध्यक्षांची मिरवणूक असेल तर कोरोना नाही. मात्र अधिवेशन असेल तर कोरोना आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी कोरोना आहे. अधिवेशनाची वेळ आली की सरकारमधील मंत्री लगेच कोरोना वाढतो आहे, असं सांगतात आणि लॉकडाऊनची भाषा करु लागतात,’ अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. ‘हा कोरोना एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे वेगाने रंग बदलतोय,’ असा मिश्किल टोला देखील त्यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!