Share

IPLAuction2021: क्रिस मॉरिससाठी लागली तब्बल १६.२५ कोटींची बोली !

Published On: 

चेन्नई : आयपीएलच्या आगामी पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव हा आज पार पडत आहे. या बोली प्रक्रियेआधी सर्व फ्रँचायजीने आपल्या ताफ्यातील रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक संघांनी मोठ्या आणि अनुभवी खेळाडूंना रिलीज केलं आहे. यामुळे इतर फ्रँचायजींमध्ये या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

खेळाडूंच्या लिलावाला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मैक्सवेल याला विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाने सर्वात जास्त १४.२५ कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केलं आहे. यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू क्रिस मॉरिस याच्यासाठी तब्बल १६.२५ कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ ७५ लाख इतकी बेस प्राईज असलेल्या मॉरिस साठी १६.२५ कोटी मोजण्यात आले आहेत.

ऑल राउंडर असलेला क्रिस मॉरिस मागील आयपीएल सत्रांमध्ये देखील महत्वाची खेळी करत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे यंदाच्या १४ व्या हंगामात त्याला कोणता संघ घेणार याची चांगलीच उत्सुकता लागली होती. मॉरिस साठी सुरुवातीला मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात बोलीची चुरस रंगली होती. मात्र, अखेरीस तब्बल १६.२५ कोटी रुपये मोजत राजस्थान रॉयल्सने आपल्या ताफ्यात जमा केलं आहे. क्रिस मॉरिसचा लिलाव हा सर्वात जास्त शकतो. येत्या आयपीएल सत्रात मॉरिसच्या खेळीकडे सर्व क्रिकेट खेळाडूंचं लक्ष्य असेल यात शंका नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!