मुंबई : ‘अमिताभ आणि अक्षय मनमोहन सिंह यांचे सरकार असताना ट्वीटरच्या माध्यमातून टीव टीव करायचे. इंधन दरवाढीवर टीका करायचे. आज ते का गप्प आहेत? केंद्र सरकारच्या देशविरोधी धोरणाविरुद्ध त्यांनीही भूमिका मांडावी. अन्यथा आम्ही आक्रमक पवित्रा घेऊ’, अशी तंबी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिलीय.
काल गांधी भवन येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले यांनी बॉलीवूड अभिनेत्यांसह मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. आजही नाना पटोले याच मुद्द्यावरून अमिताभ बच्चन व अक्षयकुमार यांच्यावर बरसले आहेत. अमिताभ आणि अक्षय यांना शेतकऱ्यांचा विसर पडल्याने, त्यांच्या चित्रपटाचे शुटींग आणि त्यांचे सिनेमे बंद पाडू, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.
नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनंही त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत’, असे म्हणत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यांवर निशाणा साधला आहे.
‘देशातील चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पैसा अक्षयकुमार कमावतो. तो परदेशी नागरिक आहे. अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाहीत. अक्षय कुमार देश चालवत नाही. अमिताभ बच्चन यांचा मेमरी लॉस झाला आहे का? या लोकांनी राजकारणात हात घालायला नको. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं आहे’, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सरकारच्या आशीर्वादाने पोलीस पूजा चव्हाण केस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत’
- वयाच्या ८८ व्या वर्षी भारताचे ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन करणार भाजपात प्रवेश
- ‘नाना पटोलेंचे ‘ते’ विधान केवळ प्रसिद्धीसाठी’ : फडणवीस
- ‘या’ तारखेला लाँच होणार स्कोडाची पहिली मेड इन इंडिया ‘संस्कृत’ नाव असलेली SUV कार
- अजानच्या आवाजाने अभिनेत्याची उडाली झोप; थेट मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

