टीम महाराष्ट्र देशा : औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांना वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणत असल्याचा आरोप होतो, यासंदर्भात प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच बी टीम व्हायला लागल्या आहेत. वंचित आघाडी ए टीम व्हायला लागली आहे. मला असं दिसतय की पुढच्या विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा नसेल असं विधान केले होते.
याला प्रत्युत्तर देताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी नेहमीच चुकीची ठरली आहे, असं सांगत त्यांनी आरशासमोर उभं रहावं, त्यांना पुढील विरोधी पक्षनेता दिसेल असं विधान केले आहे. ते कोल्हापूर येथील कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र बनवण्याची घोषणा केली आहे. या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेता होण्यासाठी जेवढ्या जागा लागतात तेवढ्याही जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या निवडून येणार नाहीत, असं मुख्यमंत्री प्रत्येक सभेत सांगत आहेत. त्यालाच थोरात यांनी उत्तर दिलं आहे.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये काँग्रेस कमिटीच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
- ‘…तर मी पवारांची औलाद सांगायचो नाही’
- विटंबना सत्र सुरूचं, पुण्यात पंतप्रधान मोदींच्या फ्लेक्सवर लावण्यात आलं शेण
- अशोकाचं झाड उंच वाढतं, त्याची सावली कोणाला मिळत नाही; मुख्यमंत्र्यांचा चव्हाणांना टोला
- यात्रांमध्ये लोकांची करमणूक करणारा कुणीतरी विदूषक लागतोच; टकलेंची दानवेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

