Share

भाजपात आले तरी राणा पाटलांना विधानसभा निवडणुकीत धोकाचं !

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद :- आगामी विधानसभा नवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या १ तारखेला पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे.जिल्ह्यात भाजपचे वारे जोरात वाहत असल्याने राणा पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील अशीच शक्यता निर्माण झाली आहे.

राणा पाटील हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचं समोर येत आहे. मात्र या मतदारसंघात पाटील हे डेंजर झोन मध्ये जातील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आमदार मधुकर चव्हाण यांचा दांडगा जनसंपर्क आहे. खां. ओमराजे निंबाळकर आणि सेनेने देखील या मतदारसंघातून आपली सर्व शक्ती पणाला लावण्याचा निर्धार केला आहे. अश्या दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागणाऱ्या पाटील यांच्या समोर दलित आणि अल्पसंख्याक सोबत येतील की नाही, यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीचा देखील राणा पाटील यांना धोका आहे. लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघात वंचित आघाडीने लक्षवेधी लढत युती – आघाडीला दिली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील वंचित स्वतंत्र लढत असल्याने दलित आणि अल्पसंख्याक मतदारांचे विभाजन होऊ शकते. त्यामुळे याचाही फटका राणा पाटील यांना बसू शकतो. राणा पाटील हे उस्मानाबाद जिल्ह्यातील जुने राजकीय प्रस्थ आहेत. असे असले तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता राणा पाटील यांना तुळजापूर मतदारसंघ हा उमेदवारीसाठी धोकादायक असल्याचं दिसत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!