Share

मोदींच्या मंत्रीमंडळात नारायण राणेंना स्थान दिल्याने सूडबुद्धीने ही कारवाई, भाजप कार्यकर्त्यांचा संताप अनावर!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : भाजपने काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळाला. जनतेशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामे जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात भाजपला या माध्यमातून यश आले. याच कारणामुळे महाविकास आघाडीच्या पोटात दुखत आहे. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोदी सरकारने मंत्रिमंडळात स्थान दिले. सूडबुद्धीने तसेच मनात आकस ठेवून ही कारवाई करण्यात आल्याची टीका वैजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ वैजापूर शहरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैजापूर शहर बंद करण्याचा प्रयत्न केला. होता परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बघता त्यांनी हा निर्णय मागे घेऊन निदर्शने केली. नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी, जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, किसान सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगतापसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जी अटक झाली त्या निषेधार्थ वैजापूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर निदर्शने केली.

संपूर्ण महाराष्ट्रात निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्यामुळे महाविकास आघाडीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली. असे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी सांगितले. नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाल्यापासून महाविकास आघाडी यांनी आकसापोटी आणि सूडबुद्धीने हा अटकेचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे जिल्हा सहकार विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जगताप यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!