🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दोन दिवसांपूर्वी जन आशीर्वाद यात्रेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. महाड, नाशिकसह पुण्यात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला असून राणे यांना काल पोलिसांनी अटक देखील केली होती. तर, मंगळवारी सकाळपासूनच शिवसेना-भाजपमध्ये राडा सुरु झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
राणेंना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला. दरम्यान, अद्यापही हा वाद कायम आहे. आह भाजप नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
यावेळी ते म्हणाले, ‘नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं. सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळालं, त्यावेळी ठाकरेंनी तेच केलं. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठं पद मिळालं म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत आहे,’ अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
नारायण राणेंची शिवसेना उभी करण्यात मोठी भूमिका – चंद्रकांत पाटील
‘नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आता जे शिवसैनिक त्यांच्या अंगावर जात आहेत ती शिवसेना उभी करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. राणेंची भाषा आणि शैली वेगळी आहे. भाजपमध्ये त्यांच्या येण्याने फायदाच झाला आहे.’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसैनिकांना सुनावलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शरद पवारांना कानाखाली मारली, तरीही ते शांत राहिले’, राणेंच्या बचावासाठी शेलारांचे वक्तव्य
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
