औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शिवसेनेने आणि शिवसेना पक्षप्रमुख यांनी भरभरून दिले. परंतु बापाने दिलेल्या कोणत्याही गोष्टीचे त्यांना भान राहिलेले नाही. त्याचमुळे त्यांनी हे बेताल वक्तव्य केलेले आहे. आता राणेंनी अवघ्या महाराष्ट्राची, महाराष्ट्रातील जनतेची तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी मागावी. असे आवाहन शिवसेनेचे वैजापूर मतदार संघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल अपशब्द काढले त्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.२४) वैजापूर शहरात मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी वैजापुर तालुक्याचे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांड, माजी नगराध्यक्ष साबेर खान, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्यासह असंख्य शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी आमदार रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात झाली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जे बेताल वक्तव्य केले त्या निषेधार्थ घोषणाबाजी करत संपूर्ण शिवसैनिक हे तहसील कार्यालयाच्या परिसरात पोहोचले. नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन मोर्चा हा वैजापूर पोलीस स्टेशनच्या दिशेने निघाला. वैजापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत यांना यावेळी निवेदन देऊन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पूर्वीचा व्यवसाय जो होता त्या व्यवसायाच्या अनुषंगाने काही उत्साही शिवसैनिकांनी मोर्चात कोंबड्या आणल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘माझ्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार’, नारायण राणेंचे ट्वीट
- नाणेफेक जिंकत विराटने संपवला ‘तो’ इंग्लंडमधील दुष्काळ
- ‘सैराट’ फेम आर्चीच्या हटके लुकने वेधले चाहत्यांचे लक्ष
- हेंडिग्ले कसोटीत नाणेफेक जिंकत विराटचा प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
- ‘भोक तुमच्या फुग्याला पडलंय राऊतसाहेब…’ ; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
