मुंबई – अयोध्येत प्रभू रामचंद्राचे मंदिर उभे करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची, सत्तेची पर्वा न करणारे कल्याणसिंह हे श्रीरामाला समर्पित व्यक्तिमत्व होते, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांना आदरांजली वाहिली. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यलयात प्रदेश उत्तर भारतीय मोर्चातर्फे कल्याणसिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग, उत्तर भारतीय मोर्चाच्या प्रभारी व प्रवक्त्या श्वेता शालिनी, उत्तर भारतीय मोर्चाचे प्रमुख संजय पांडे, ब्रिजेश सिंग आदी या प्रसंगी उपस्थित होते.फडणवीस म्हणाले की, कल्याणसिंह यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राम मंदिरासाठी सुरु असलेला शेकडो वर्षांचा लढा निर्णायक टप्प्यात आला. कोणत्याही परिस्थितीत अयोध्येत कारसेवेसाठी जमलेल्या कारसेवकांवर गोळीबार करणार नाही, हा निर्धार त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या कल्याणसिंह यांनी प्रत्यक्षात आणला.
आपल्या मुख्यमंत्रीपदाची पर्वा न करता कल्याणसिंह यांनी अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी चालू असलेल्या संघर्षात अमूल्य योगदान दिले. राम मंदिरासाठी सत्तेचा त्याग करणारे कल्याणसिंह हे उत्तम शासक होते. त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उत्तर प्रदेशात कॉपी विरोधी कायदा करण्यात आला. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांना चाप लावण्यासाठी त्यांनी कठोर पावले उचलली, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये इंजिनिअर पदासाठी भरती
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
