🕒 1 min read
यवतमाळ: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान त्यांना याप्रकरणी जामीनही मिळाला आहे. मात्र याविरोधात राज्यभरात शिवसैनिकांनी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. दरम्यान यवतमाळ येथे आंदोलनवेळी शिवसेना पदाधिकारी संतोष ढवळे यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
राणे राज्यात कोठेही असो ते जिथे दिसेल तिथेच त्यांचे एन्काऊंटर करणार असल्याचे शिवसेना नेते संतोष ढवळे यांनी म्हटले आहे. दरम्यान या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
दरम्यान राणे यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर राणे आज ४ वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान यावेळी त्यांच्या जुहू येथील घरावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. राणे यांच्या वक्तव्यावरून कालपासून तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया राज्यभरात उमटत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानकडून विंडीजचा १०९ धावांनी पराभव, मालिका १-१ अशा बरोबरीत
- ‘सोमय्या यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा सुरू करावा’ ; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- ‘त्या’ १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेशी माझा दमडीचाही संबंध नाही, भुजबळांचा दावा
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
