🕒 1 min read
मुंबई: राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर १२ सदस्यांची अजूनही नियुक्ती राज्यपाल कोश्यारी यांनी केली नाही. दरम्यान यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी गेल्या आठ महिन्यांपासून राज्यपालांकडे प्रलंबित आहे. आता यापुढे 12 आमदारांबाबत आग्रही नाही असं राज्यपाल बोलले होते पण आता शहाण्यांना शब्दाचा मार.. फक्त शहाण्यांना, या पुढे 12 आमदारांच्या प्रश्नाबाबत शब्द खर्ची घालणार नाही. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र दिले होते. तिन्ही पक्षांचे नेते हे पत्र देऊन आले, पण राज्यपाल यांना वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहत नाही असा टोला शरद पवारांनी लगावला. आता यावरूनच भाजपचे अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर निशाना साधला आहे.
शरद पवार आपण ज्या महाविकास आघाडीचे रिमोट आहात, त्या आघाडीला न्यायालयाकडून रोज जोडे पडत आहेत. त्या जोड्यांचा जरा विचार करा आणि नंतर राज्यपालांवर नथीतून तीर चालवा. असा सल्ला देत त्यांनी अप्रत्यक्षरित्या राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.
मा. @PawarSpeaks साहेब आपण ज्या महाविकास आघाडीचे रिमोट आहात, त्या आघाडीला न्यायालयाकडून रोज जोडे पडतायत. त्या जोड्यांचा जरा विचार करा आणि नंतर राज्यपालांवर नथीतून तीर चालवा. pic.twitter.com/PWarHvLIbc
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2021
दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पावर यांच्या टीकेला प्रतिउत्तर देत ‘शरद पवार देशातील सन्मानीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी माझ्यावर टीका केली म्हणून मी करावी असं नाही’ असे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- १३४ प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात तब्बल ८०० प्रवासी; विमानाची अवस्था मुंबई लोकलसारखी !
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
