काबुल : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी तेथून पळ काढत आहेत. सोमवारी विमानतळावर झालेल्या गर्दीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याचबरोबर विमानाच्या चाकाला लटकलेल्या लोकांपैकी काही जण खाली पडून मृत्यूमुखी पडले. त्याच विमानातील आतला फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अमेरिकन कार्गो सैन्याच्या 134 प्रवासी क्षमता असलेल्या विमानात तब्बल 800 हून अधीक प्रवासी प्रवास दाटीवाटीकरुन बसले होते. तालिबानच्या जुलमी राजवटीत जाण्यापेक्षा लोक असेल त्या अवस्थेत अफगाणिस्तानमधून पळ काढत आहेत. 134 प्रवासी क्षमता असणाऱ्या विमानात 800 लोकांना प्रवेश देण्यात आला होता.
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांनी चक्क विमानतळाच्या धावपट्टीवरच गर्दी केली होती. विमान धावपट्टीवरुन धावायला लागले तेव्हा अनेकजण विमानासोबत धावत धावत भीती न बाळगता विमानच्या चाकाला आणि लँडिंग गीअरला लटकून प्रवास करत होती. अशा अवस्थेतही विमानाने उड्डाण केले. या विमानाची अवस्था अगदी मुंबईच्या लोकलसारखी झाल्याचं पाहायला मिळालं. एकूणच अफगाणिस्तान मधील स्थिती ही भयानक असून आता जो तो जीव वाचवून इतर देशात जाण्यासाठी धडपड करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- शरद पवार देशाचे माननीय नेते, त्यांच्यावर आपण काय टीका करणार – राज्यपाल कोश्यारी
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- ‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
