पुणे : राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांनी केलेल्या टीकेवर राज्यपालांनी बोलणं टाळलं. मात्र, शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यांच्यावर आपण काय टीका करणार? ते देशाचे माननीय नेते आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायलाच हवी का?, असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.
भगतसिंह कोश्यारी हे काल सिंहगडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांना पवारांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. राज्यपालांनी सिंहगडावर तानाजी मालुसरेंच्या समाधीचं दर्शन घेतलं. समाधी परिसरात वृक्षारोपणही केलं.
शरद पवारांची राज्यपालांवर टीका –
शरद पवार यांनी काल मुंबईत मीडियाशी संवाद साधताना राज्यपालांवर बोचरी टीका केली होती. मी राज्यपालांचं वक्तव्य ऐकलं. ते म्हणाले सरकार मागणी करत नाही तुम्ही का विचारताय? मात्र, पत्र गेलेलं आहे. वाढत्या वयामुळे त्यांच्या लक्षात राहीलं नसेल. त्यांनी आधी पत्र दिलं, त्यानंतर शिष्टमंडळही भेटून आलं. आपल्याकडे म्हण आहे शहाण्यांना शब्दाचा मार, असं म्हणत पवार यांनी राज्यपालांना खोचक टोला लगावला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर भारताची भूमिका स्पष्ट, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- ‘राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे’, मनसेची टीका
- ‘भारतात शांतता नांदावी यासाठी लोकसभा अध्यक्ष्यांचे तिरुपतीला साकडे’
- ‘त्या’ धुंद नशेत ते देश, तिरंगा विसरले आहेत’


