औरंंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात रूग्णांना संजीवनी ठरत असलेले पाच रेमडेसिविर इंजेक्शन चोरट्याने चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयातून चोरून नेले. ही घटना २४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यापुर्वी देखील जिल्हा सामान्य रूग्णालयातून रेमडेसिविर इंजेक्शन चोरी झाल्याचा प्रकार घडला होता. परंतु त्यावेळी पोलिसात तक्रार देण्यात आली नव्हती.
चिकलठाणा परिसरातील जिल्हा सामान्य रूग्णालयात गेल्या वर्षभरापासून कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. जिल्हा सामान्य रूग्णालयातील परिचारीका मिना जावळे (वय ४८, रा.शारदा अपार्टमेंन्ट, आकाशवाणी परिसर) या शनिवारी सायंकाळी नाईट ड्युटीवर होत्या. सायंकाळी सहा ते साडेसात वाजेच्या दरम्यान मिना जावळे या वॉर्डातील दाखल रूग्णांना औषधी देण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी हॉस्पीटलमधील फ्रीजमध्ये १६ रेमडेसिविर इंजेक्शन त्यांनी ठेवले होते. रूग्णांना औषधी देवून परत आल्यावर त्यांनी पाहणी केली असता, फ्रिजमधील ५ रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ हा प्रकार जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिला. रेमडेसिविर इंजेक्शन चोरून नेणा-या चोरट्याविरूध्द एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील उपनिरीक्षक संदीप बागुल करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने घोषणा केली ४० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची अन् दिले २६ हजारच; मंत्री शिंगणेंची माहिती
- ‘ठाकरे सरकारमधील नेते श्रेयासाठी हपापलेले, त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे पित्त खवळले’
- महिलेचा छळ करणारा संजय राऊत हा विकृत माणूस, त्यांना अटक झालीच पाहिजे – निलेश राणे
- ‘रजनी सर म्हातारे होत आहेत म्हणून…’ जडेजाच्या कामगिरीनंतर धोनीचे ट्विट व्हायरल
- इशारा काय देता ? बदनामीचा खटला दाखल कराच; मुश्रीफांचे चंद्रकांत पाटलांना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

