Share

शहरात नाका बंदितही चोरट्यांचा धुमाकूळ! पटेलनगरात घर फोडले

Published On: 

औरंंगाबाद : घराला कुलूप लावून कुटुंबियासह बाहेरगावी गेलेल्या सुदाम दगडू वाघ (वय ४८,रा.पटेलनगर,चिकलठाणा) यांचे घर फोडून चोरट्याने २० हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ जून ते ३ जुलैदरम्यान घडली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत हर्सुल परिसरात असलेले मोबाईल रिपेरिंगच्या दुकानाचे पाठीमागील पत्रा उचकटून चोरट्यांनी २३ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना २ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी तबरेज समशेर खान (वय २४,रा.हर्सुल) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सुल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच टिळकपथ रोडवरील कॉटनकिंग दुकानासमोर मोबाईलवर बोलत उभे असलेले नवनाथ सुर्यभान बोडखे (वय ४०,रा.औरंगपुरा) यांचा ६ हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना १ जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!