Share

‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या २४ वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्यानंतर आख्ख्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे. पण आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमधून या व्यवस्थेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षांपासून स्वप्निल मुलाखतीच्या प्रतिक्षेत होता. पण मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता.

या घटनेमुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार या निर्णयाबाबत चालढकलपणा करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यात आता या आत्महत्येमुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला हल्लाबोल सुरू केला आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनीही या आत्महत्येला महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरले आहे. ‘स्वप्नीलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे’ असा आरोप त्यांनी केलाय.

ते म्हणाले की, ‘ठाकरे सरकारने केलेली ही मर्डर आहे. हे सरकार स्वतःच्या मस्तीत असल्यामुळे त्यांचे महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष नाही. एमपीएससी हा विषय इतक्या वेळा ऐरणीवर येऊन सुद्धा राज्य सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.’

तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही या घटनेवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!