मुंबई : केंद्राच्या जाचक शेतकरी विरोधी कायद्याला आमचा कायम विरोध राहिलेला आहे. त्यामुळे राज्यात कृषी कायदा करताना शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांची तीच भूमिका आहे असे राष्ट्रवादीने नुकतेच जाहीर केले आहे. दरम्यान आज महसूल मंत्री तथा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषी कायद्यावर भाष्य केले आहे.
थोरात यांनी कृषी कायद्यासंदर्भात ठराव करण्याची काही जणांची मागणी असल्याचे सांगितले. या संदर्भातही चर्चा सुरू आहे. केंद्राचा कृषी कायदा हा शेतकऱ्यांना अडचणीचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य वेगळा कायदा करण्याच्या तयारीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात कृषी कायदा होताना शेतकरी विरोधात कुठलाही कायदा होणार नाही ही तिन्ही पक्षांची भूमिका आहे. याबाबत शरद पवार यांनीही कृषी कायद्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट कृषी कायद्यासंदर्भात भूमिका मांडली होती.
दरम्यान, व्यापारी आणि शेतकऱ्यांत झालेल्या कराराच्या अटीनुसार, ठरलेल्या तारखेपासून सात दिवसांच्या आत व्यवहार पूर्ण केला नाही, तर तो शेतकऱ्यांचा छळ समजला जाईल. त्यासाठी तीन वर्षांपर्यंत कारावास किंवा पाच लाख रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा सुनाविण्यात येतील, अशी महत्त्वाची सुधारणा करणारे विधेयक राज्य सरकारने तयार केले असून, ते रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘भागवत धर्माची पताका खाली ठेवायला सांगणे चुकीचे, मोगलाईतही असे झाले नव्हते’, फडणवीसांचा घणाघात
- ‘स्वप्निलची आत्महत्या नव्हे, हा तर ठाकरे सरकारने केलेला मर्डर आहे!’
- ‘..अन्यथा हेच तरूण तुमच्या गळ्याला फास लावतील’, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
