मुंबई : एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थ्याने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात आत्महत्या केली आहे. स्वप्निल लोणकर (वय-२४) असे त्याचे नाव आहे. स्वप्निलने फुरसुंगी परिसरातीलराहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
स्वप्नील शिक्षण पुर्ण झाल्यापासून एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो एमपीएससी’च्या 2019 च्या पुर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याची मुलाखत दिड वर्षांपासून झालेली नव्हती. त्याचबरोबर त्याने 2020 मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली. त्यामध्ये पुर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला, कोरोनामुळे मुख्य परिक्षा झाली नाही. या सगळ्या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचे मृत्युपुर्वी चिठ्ठीत लिहून ठेवले आहे.
या घटनेमुळे एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या संदर्भात निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडी सरकार या निर्णयाबाबत चालढकलपणा करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यात आता या आत्महत्येमुळे सरकारवरील दबाव वाढला आहे. या प्रकरणावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे.
ते म्हणाले, स्वप्नील लोणकर या तरुणाने #MPSC कडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱ्या विलंबाने मात्र धीर खचला,त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका असे आवाहन त्यांनी युवकांना केलेय.
#महाविकासआघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत. @ANI
— Raju Shetti (@rajushetti) July 4, 2021
तसेच महाविकासआघाडी सरकारने आतातरी डोळे उघडून त्यांच्या प्रश्नाकडे डोळसपणे बघून त्यांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवावेत अन्यथा हेच तरूण एक दिवस तुमच्या गळ्याला फास लावल्याशिवाय सोडणार नाहीत असा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
- ‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन
- ‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार
- ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’, परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने युवकाची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

