Share

मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..

Published On: 

लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. याकरिता राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. युपीतील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप स्थानिक परिस्थितीची चाचपणी करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. योगीच पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा भाजपात आहे. आणि जवळपास हे निश्चितही मानले जात आहे.

या सर्व घडामोडींवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिलं आहे. ‘योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही’, असे ओवेसी म्हणालेत. यानंतर योगींनी ओवेसींचे आव्हान स्वीकारले आहे. एका हिंदी वृत्तवाहिणीशी संवाद साधताना ओवेसींच्या आव्हानावर योगींनी प्रतिक्रिया दिली आहे.

योगी म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार बनणार आहे. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजपा आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो.’

एमआयएम युपीत शंभर जागा लढवणार
बिहार विधानसभेला ओवैसींच्या पार्टीला चांगला यश मिळालं. बंगालमध्ये ते फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत. पण यूपीत मुस्लिमांच्या संख्या पहाता, मोठ्या यशाची एमआयएमला अपेक्षा आहे. त्यामुळे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनने छोट्या पक्षांसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलाय. तसच असदुद्दीन औवेसींनी 100 जागा लढवणार असल्याची घोषणा केलीय. काही दिवसांपूर्वी ओवेसी म्हणाले होते की, ‘उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवात केली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे, अन्य कुणाशी नाही.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!