🕒 1 min read
मुंबई : कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने अवघा २ दिवसांचे अधिवेशन घेण्याचे ठरवले आहे. राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असताना आणि कोरोना काहीअंशी आटोक्यात आला असताना अवघ्या दोन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येणार असल्याने ठाकरे सरकारवर चौफेर टीका होत आहे. सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर येऊ नये म्हणूनच हे अधिवेशन दोन दिवसात उरकण्यात येणार असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे.
दरम्यान, उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘महाविकास आघाडी सरकार, शिवसेना यांचे राज्याच्या, जनतेच्या हिताचे बरेच मुद्दे असू शकतात. त्यावर चर्चा होणे, निर्णय होणे, कायदे मंजूर होणे गरजेचं आहे. परंतु, विरोधी पक्षाने अधिवेशन दोन दिवस पूर्णपणे चालू दिले पाहिजे. विरोधी पक्षाला महाराष्ट्राच्या हिताची काळजी असेल तर ते कामकाज दोन दिवस व्यवस्थितपणे चालू देतील. अधिवेशन केवळ दोन दिवसांचे असल्याने गोंधळात ते वाहू देऊ नये, अशी जनतेची इच्छा असल्याचेही राऊत म्हणाले.
यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका केली आहे. ‘दोन दिवसाचे अधिवेशन कसे चालवायचे हे आता संज्या राऊत सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे’ असा हल्लाबोल त्यांनी केलाय.
२ दिवसाचं अधिवेशन कसं चालवायचं हे आता संज्या राऊत सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे. अधिवेशन चालवण्याची धमक नाही ठाकरे सरकारमध्ये कारण कोरोना काळात केलेला भ्रष्टाचार महाराष्ट्राला कळेल म्हणून अधिवेशन नको, मीडिया नाही तरी दाखवत नाही हे सगळं म्हणून ठाकरे सरकारचं फावतय.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 4, 2021
निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, ‘२ दिवसाचे अधिवेशन कसं चालवायचं हे आता संज्या राऊत सांगणार, इतके खराब दिवस आलेत महाराष्ट्राचे. अधिवेशन चालवण्याची धमक नाही ठाकरे सरकारमध्ये. कारण कोरोना काळात केलेला भ्रष्टाचार महाराष्ट्राला कळेल म्हणून अधिवेशन नको, मीडिया नाही तरी दाखवत नाही हे सगळं म्हणून ठाकरे सरकारचं फावतय.’ असे ते म्हणालेत.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा मार्गी लावण्याचा प्रयत्न सरकार करणार असून एक मोठे दिव्य या साठी सरकारला पार करावे लागणार आहे. विरोधकांनी देखील या दोन दिवसांच्या अधिवेशनात सरकारला घेरण्याची मोठी योजना आखली असून आक्रमक विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सामना कसा करावा हाच मुख्य प्रश्न महाविकास आघाडीसमोर आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री होऊ न देण्याचे ओवेसींचे आव्हान योगींनी स्वीकारले, म्हणाले..
- ‘राज्याची चिंता असेल तर अधिवेशन चालू द्या, गोंधळ घालू नका’, खा.राऊतांचे विरोधकांना आवाहन
- ‘जहाँ हमारे नाम से आग लग जाती है!’, राऊतांचा शायरीतून वार
- ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’, परीक्षा पास होऊनही नोकरी न मिळाल्याने युवकाची आत्महत्या
- ‘होय, मी शेलारांना भेटलो! आम्ही कॉफीही पिलो’, ‘त्या’ भेटीवर राऊतांचा खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
