मुंबई : गेले ६ महिने कोरोनाने राज्यासह देशात देखील थैमान घातला आहे. कोरोना महामारीला प्रतिबंध घालण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला होता. तर, जून महिन्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु केल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. आता अनलॉक- ५ लागू करण्यात आला असून रेस्टोरंट, बार देखील सुरु करण्यात आले आहेत.
तर, भाजपसह वंचित बहुजन आघाडीने देखील मागील महिन्यात प्रार्थनास्थळे सुरु करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलं होतं. भाजपने घंटानाद आंदोलन करून देखील कुंभकर्णापेक्षा गाढ झोपेत असलेल्या सरकारला जाग कधी येणार असा उद्विग्न सवाल करण्यात आला होता. तर, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वारकरी संघटनांसोबत आंदोलन करत पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात प्रवेश करून आंदोलन करण्यात आलं. मात्र, अजूनही मंदिर खुले करण्याबाबत सरकारने पावले उचलले नसल्याने भाजपने महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरूच ठेवला आहे.
यावर, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. “आम्हाला धार्मिकस्थळं उघडण्यात कोणतीच अडचण नाही. परंतु आम्हाला लोकांची काळजी आहे. हे सरकार लोकांची काळजी घेणारं सरकार आहे. त्यामुळे विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी लोकांची काळजी घेण्यात हे सरकार कमी पडणार नाही” असा खुलासा शेख यांनी केला आहे.
“कोव्हिडचा प्रसार महाराष्ट्रात आणि देशात झपाट्याने होत आहे. कोव्हिडच्या संख्येत आपण जगात 2 नंबरला आहोत. हे तरी कमीत कमी विरोधकांनी लक्षात घ्यायला हवं. मी त्यांना सांगू इच्छितो की ज्या राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत. तिथे त्यांनी धार्मिकस्थळं उघडण्याचा सल्ला द्यावा”, असा घणाघात देखील त्यांनी भाजपवर केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘…मात्र आमच्या पक्षात या असं म्हणायची हिम्मत कोणीही केली नाही’
- पायल घोषने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
- ठाकरे म्हणतात…लोकलची संख्या वाढल्यास अधिक लोकांना प्रवास करण्यास परवानगी!
- ‘हिंमत असेल तर राष्ट्रवादीने स्वबळावर लढून दाखवावं’; पाटलांचं खुलं आव्हान
- ‘खडसे पक्षांतर करणार हे सत्य’ : गुलाबराव पाटील


