मुंबई : २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात आलं होत. यानंतर सुमारे वर्षभर विनोद तावडे यांना सक्रिय राजकारणातून अलिप्त राहावं लागलं होतं. इतर पक्षातील मित्रांनी मला चमत्काराशिवाय नमस्कार नाही असा सल्ला दिला. अजित पवारांसह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही संपर्क साधला, असा गौप्यस्फोट विनोद तावडेंनी केला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली होती. यावेळी विनोद तावडेंसह पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी सोपवत पक्षाने त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी या दोघांची वर्णी लागली आहे. यानिमित्त आज मुंबईमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विनोद तावडेंचा सत्कार करण्यात आला.
सत्कारावेळी विनोद तावडे म्हणाले, ‘ पक्षाने माझ्या हिताचा निर्णय घेतला तर पक्ष चांगला, माझ्या मनाविरुद्ध निर्णय घेतला तर पक्ष वाईट असा समजणार मी नाही. मध देणाऱ्या कमळाच्या पाकळ्यांना भुंगासुद्धा नुकसान करत नाही, आपण तर माणसं आहोत.’ तर, ‘२०१९ मध्ये पक्षाने मला उमेदवारी नाकारली यावेळी इतर पक्षातील मित्रांनी मला चमत्काराशिवाय नमस्कार नाही असा सल्ला दिला. अजित पवारांसह उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनीही संपर्क साधला. मात्र, माझा मूळ पिंड भाजप, संघ आणि अभाविपचा असल्याने कोणीही मला त्यांच्या पक्षात बोलवण्याची हिम्मत केली नाही.
महत्वाच्या बातम्या :
- बिहार निवडणूक : कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ ‘या नेत्याला मिळाले स्थान
- पायल घोषने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
- ठाकरे म्हणतात…लोकलची संख्या वाढल्यास अधिक लोकांना प्रवास करण्यास परवानगी!
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘खडसे पक्षांतर करणार हे सत्य’ : गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

