मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पुणे महापालिकेतील सत्ता आणि प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीचं निमित्त साधून पाटलांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात जास्त जास्त ऊर्जा वायाला घालवू नये. कारण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे आम्ही पण त्यांचे बाप आहोत.’ असा जोरदार टोला लगावला आहे.
यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवर घणाघात केला आहे. ‘काल भाजपाच्या एका महाशयाने, “आम्ही तुमचे बाप आहोत” असे वक्तव्य केले. त्यांच्या माहिती करता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 चाली पुणे मनपात पुण्याची जनता अजित दादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल काळजी करू नका.’ अशी फेसबुक पोस्ट करून त्यांनी भाष्य केलं आहे.
‘हिंमत असेल तर राष्ट्रवादीने स्वबळावर लढावं’!
या वादावर आता चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसला खुलं आव्हान दिलं आहे. “गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार येऊनही विश्वासघात झाल्यामुळे आम्ही सत्तेत येऊ शकलो नाही. त्यावेळी सत्तास्थापनेसाठी घडलेला प्रकार भारतीय संस्कृतीला साजेसा नाही. दगा देऊन काहीही होऊ शकते. मात्र, तुमच्यात हिंमत असेल तर मैदानात उतरुन योग्यप्रकारे लढा.” असा घणाघात त्यांनी केला आहे.
तर, “2022 कशाला 2024च्या विधानसभेलाही माझे ओपन चॅलेंज आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी वेगवेगळे लढावे. आम्हीदेखील स्वबळावर लढू. मग कोणाला किती जागा मिळतात, ते पाहू,” असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘…मात्र आमच्या पक्षात या असं म्हणायची हिम्मत कोणीही केली नाही’
- पायल घोषने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागितली मदत
- ठाकरे म्हणतात…लोकलची संख्या वाढल्यास अधिक लोकांना प्रवास करण्यास परवानगी!
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘खडसे पक्षांतर करणार हे सत्य’ : गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
