मुंबई : कोरोना विषाणूला प्रतिबंध घालण्यासाठी राज्यासह देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सार्वजनिक वाहतूक देखील पूर्णपणे बंद करण्यात आली होती. तर, मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या लोकलची सेवा देखील या काळात बंद करण्यात आली होती. जूनमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन उठवल्यानंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरु करण्यात आली होती.
आता अनेक खाजगी कार्यालायसह दैनंदिन व्यवहार सुरु झाल्यामुळे नागरिकांना दळणवळण करावे लागत आहे. मात्र, सद्या मुंबईतील लाईफलाईन असलेली लोकल सेवा अजूनही बंद ठेवल्याने बेस्ट वरील ताण वाढत आहे. बेस्ट बसेसमध्ये तुडुंब गर्दी होत असूनही राज्य सरकार व महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अनेक नागरिकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत असून मनसेने देखील आक्रमक भूमिका घेत कायदेभंग आंदोलन केले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना स्थिती, मुंबई लोकल, प्रार्थनास्थळे सुरु करण्यावर भाष्य केलं. ‘राज्यांतर्गंत रेल्वेची वाहतूक सुरू केली आहे. हळूहळू काही गोष्टी सुरु केल्या आहेत. लोकलसाठी फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. कारण मला गर्दी नकोय. सगळ्यांनाच लोकलनं जायचंय. लोकलची संख्या वाढल्यानंतर आपण त्यातून अधिक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देऊ.’ असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केल्याने मुंबईकरांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.
तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही : ठाकरे
‘गणपती होऊन गेले, नवरात्र, दिवाळी येत आहे. त्यामुळे मी मंदिर खुली करण्याबाबत हळुवार पणाने जात आहे. काही जणं म्हणतात हे उघडलं ते का नाही? जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्याहून जास्त जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे तंगड्यात तंगडं घालून सर्व बंद ठेवण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे येत्या सर्वधर्मांच्या सणात आपल्याला खूप काळजीपूर्वक राहावं लागणार आहे’ असं सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- बिहार निवडणूक : कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ ‘या नेत्याला मिळाले स्थान
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘खडसे पक्षांतर करणार हे सत्य’ : गुलाबराव पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

