जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना सोयीस्करपणे राजकारणातुन डावलण्यात आल्याचे आरोप खुद्द त्यांनीच काही भाजप नेत्यांवर लावले होते. यानंतर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेल्या नाराजीची खदखद त्यांनी माध्यमांमध्ये व्यक्त केली होती. मात्र, भाजप पक्षाला अडचणीच्या काळात उभारी देणाऱ्या नेत्यांपैकी एक असल्याने पुन्हा सक्रिय होण्याची संधी मिळेल या आशेवर एकनाथ खडसे अजूनही भाजपमध्येच आहेत.
गेल्या आठवड्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजपच्या नाराज नेत्या पंकजा मुंडे व विनोद तावडे यांना राष्ट्रीय सचिव पदी नियुक्त करून राजकीय पुनर्वसनाचा प्रयत्न केला गेला मात्र दुसऱ्याबाजूला एकनाथ खडसेंना डावलण्यात आल्याने त्यांनी पक्ष सोडून योग्य निर्णय घ्यावा अशा मागणीचा जोर समर्थकांनी लावला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
अशातच राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज जळगावात खडसेंच्या पक्षांतरावर सूचक वक्तव्य केलं आहे. ‘सध्या एकनाथ खडसे कोणाच्या संपर्कात आहेत, याची वस्तुस्थिती मला माहिती नाही. पण ते पक्षांतर करतील हे सत्य आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीला खडसेंनी उपस्थिती लावली होती.
“एकनाथ खडसे हे आमचे पालक आहेत. बंद खोलीत त्यांनी आमच्या दोन थोबाडीत मारल्या तरी हरकत नाही. त्यांनी प्रत्येकवेळी बोलण्यासाठी दांडे (चॅनेल) वापरू नयेत, असे मत व्यक्त करतानाच खडसे भाजप सोडून कुठेही जाणार नाहीत,”असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- बिहार निवडणूक : कॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ ‘या नेत्याला मिळाले स्थान
- निवडणूक आयोगानं शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ नाकारत ‘बिस्किट’ दिलं
- रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – पडळकर
- भारतात गांजा कायदेशीर झालाच पाहिजे ; अभिनेता रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य
- मनोज कोतकर यांच्यावर कारवाईसाठी भाजपला मुहूर्त सापडेना!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

