मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गळती आटोक्यात आली असून वैद्यकीय सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये आधीच ऑक्सिजनची कमालीची कमतरता आहे. गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयात गंभीर प्रकृती असलेले सुमारे १२० हुन अधिक रुग्ण हे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर होते. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचं दिसून आलं.
दरम्यान, या दुर्घटनेननंतर आता अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणात बेपर्वाई झाल्याने दुर्घटना घडली असेल तर त्यांना कडक शासन व्हायलाच हवं, अशी मागणी केली आहे. ‘ऑक्सिजन गळतीमुळे नाशिक येथील रुग्णालयात निष्पाप रुग्णांना जीव गमवावा लागला. ही घटना अतिशय वेदनादायी आहे. मृतांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आहे पण जर कुणाकडून बेपर्वाई झाली असेल तर त्यांना सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं.’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘विकास दर टिकवण्यासाठी उद्योग आणि सरकारमध्ये पूर्ण विश्वास हवा’
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

