Share

विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप

Published On: 

कोलकाता : कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या देशवासियांनी प्राथमिकपण लस देणे आवश्यक आहे. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लसींची खुल्या बाजारात विक्री केल्याने देशात कोरोना लसींचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देशात अराजक माजण्याची भीती आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र पाठवून केंद्राचे लसीकरण धोरण पोकळ असल्याचा आरोप केला. देशात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना केंद्राने १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात गुणवत्ता, दक्षता, पुरवठा व किमतीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा कोणताही उल्लेख नाही. परिणामी, या निर्णयामुळे देशात अराजक माजण्याची भीती आहे, असे त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, बंगालने गत २४ फेब्रुवारी रोजी एका पत्राद्वारे केंद्राकडे थेट कंपन्यांकडून लस खरेदी करून लोकांना मोफत लस देण्यासाठी परवानगी मागितली होती; पण केंद्राने अद्याप त्याला प्रतिसाद दिला नाही. आता देशात कोरोनामुळे हाहाकार माजला असताना केंद्राने लोकांना लस उपलब्ध करवून देण्यासाठी पोकळ भाषणबाजी करून स्वत:च्या जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप ममतांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!