Share

‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल

Published On: 

नवी दिल्ली : आजमितीला देशात दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्राने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्राने लस कंपन्यांना आपल्या मासिक उत्पादनांपैकी ५० टक्के लसी राज्यांना व खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी दिली आहे.

पण या निर्णयावरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सुरू केले आहे. कोरोनाग्रस्त राहुल गांधी हे तर वारंवार सोशल मीडियाद्वारे मोदींवर निशाणा साधत आहेत. केंद्र सरकारचा लसीकरण निर्णय हा नोटाबंदीपेक्षा कमी नाही असा आरोप त्यांनी केलाय. सामान्य नागरिक लसीकरणासाठी रांगेत थांबतील. पैसे, आरोग्य आणि जीव धोक्यात घालतील आणि शेवटी या मोहिमेचा फायदा केवळ उद्योगपतींना होईल अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

तसेच राहुल केंद्राचे हे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असल्याचा आरोप केला आहे. केंद्राच्या धोरणानुसार देशात १८ ते ४५ वर्षांपर्यंत नागरिकांना मोफत लस मिळणार नाही. मध्यस्थांना मूल्य नियंत्रणाशिवाय यात हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आली. यात समाजातील दुबळ्या घटकांना लस देण्याची कोणतीही हमी नाही. केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण आहे. त्यात वितरणाची कोणतीही रणनीती नाही, असे राहुल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!