नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्राच्या लसीकरण धोरणावर टीका केली आहे. केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असून, त्यात समाजातील दुबळ्या घटकांना लस देण्याची कोणतीच हमी नाही, असे त्यांनी म्हटले आहे. देशातील १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना मोफत लस नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
देशात कोरोनाचा संसर्ग भयानक वाढला आहे. आजमितीला देशात दररोज अडीच लाखांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे केंद्राने १ मे पासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांनाच लस देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत केंद्राने लस कंपन्यांना आपल्या मासिक उत्पादनांपैकी ५० टक्के लसी राज्यांना व खुल्या बाजारात विक्री करण्याची परवानगी दिली आहे. पण यासाठी कंपन्यांना या लसींची किंमत १ मेपूर्वी घोषित करावी लागणार आहे. त्यानंतर याच किमतीने राज्यांसह खासगी रुग्णालये व औद्योगिक संस्थांना लसींची खरेदी करावी लागणार आहे.
• No free vaccines for 18-45 yr olds.
• Middlemen brought in without price controls.
• No vaccine guarantee for weaker sections.
GOI’s Vaccine Discrimination- Not Distribution- Strategy!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
राहुल गांधी यांनी केंद्राचे हे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण असल्याचा आरोप केला आहे. केंद्राच्या धोरणानुसार देशात १८ ते ४५ वर्षांपर्यंत नागरिकांना मोफत लस मिळणार नाही. मध्यस्थांना मूल्य नियंत्रणाशिवाय यात हस्तक्षेप करण्याची परवानगी देण्यात आली. यात समाजातील दुबळ्या घटकांना लस देण्याची कोणतीही हमी नाही. केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण आहे. त्यात वितरणाची कोणतीही रणनीती नाही, असे राहुल यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक
- रोहितसाठी चेंडु बदलता येतो राहुलसाठी का नाही; इरफान पठानने उपस्थित केला प्रश्न
- धक्कादायक : नाशिकमध्ये डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती
- उस्मानाबादेत वाढत्या रुग्णसंख्ये सोबत कोविड केअर सेंटरच्या मागणीत वाढ


