वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कठोर निर्णय घेतले होते. अमेरिका फर्स्टच्या नावाखाली ट्रम्प यांनी अनेक देशांवर नाहक बंधन लादली. याचा फटका अनेक मुस्लीम राष्ट्रांसह प्रामुख्याने इराणला बसला. पण तेथील नागरिकांनी त्यांना निवडणुकीत पराभूत करून ट्रम्पचे निर्णय अमेरिकेसाठी नुकसानीचे आहेत हे दाखवून दिले. पण म्हणतात ना की, सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही. अशीच काहीशी अवस्था ट्रम्प यांची झाली आहे. त्यामुळे पराभूत होऊनही ते अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना काही ना काही सल्ले देत असतात. असाच एक सल्ला त्यांनी आता बायडेन यांना दिलाय.
बायडेन यांना देशाला कट्टरपंथी मुस्लिम दहशतवादापासून सुरक्षित ठेवण्याची इच्छा असेल तर त्यांनी अन्य देशांतून येणाऱ्या लोकांवर लावण्यात आलेले निर्बंध व देशात येण्यास इच्छुक असणाऱ्या लोकांच्या चौकशीचे सर्वच उपाय पुन्हा एकदा लागू केले पाहिजेत. एवढेच नाही, तर त्यांनी शरणार्थींवरील निर्बंधांचीही पुन्हा अंमलबजावणी करावी, असे ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे.
तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण, इराक, लीबिया, सोमालिया, सूडान, सीरिया तथा येमेनसह अनेक मुस्लिम देशांवर प्रवास निर्बंध लादले होते. यामुळे अमेरिकेवर जगभर टीका झाली होती. त्यानंतर जो बायडेन यांनी अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर हे निर्बंध रद्द केले होते. ट्रम्प यांनी एका निवेदनाद्वारे पुन्हा बायडेन यांना हे निर्बंध लागू करण्याचे आवाहन केले आहे.
अतिरेकी संपूर्ण जगात सक्रिय आहेत. ते ऑनलाईन भरती करतात. युरोपीयन देश व अमेरिकेने शरणार्थींसंबंधी यापूर्वी केलेल्या चुका टाळण्यासाठी आपल्याला आपल्या देशाला दहशतवाद व कट्टरपंथापासून दूर ठेवण्यासाठी योग्य व्यावहारिक निर्णय घ्यावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका
- नाशिकमध्ये रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमध्ये ११ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू
- पुणे : गजा मारणे मिरवणूक प्रकरणात माजी खासदार संजय काकडेंना अटक


