Share

“हे सरकार २५ वर्षे टिकणार आहे म्हणे”, ‘त्या’ प्रकरणावरून भातखळकरांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेच्या २५ आमदारांनी निधीबाबत होत असलेल्या अन्यायाविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांपूर्वी भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, निधीवाटपाबाबत आमच्यावर अन्याय होत आहे. निधी मिळाला नाही तर आम्ही अर्थसंकल्पाच्या वेळी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकू. यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (Criticism of Atul Bhatkhalkar) यांनी निशाणा साधला आहे.

“निधी मिळणार नसेल तर आम्ही अर्थ संकल्पावर बहिष्कार घालू असा पवित्रा शिवसेनेच्या २५ आमदारांनी घेतल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादीने अर्थ खाते कायम आपल्याकडे राहील याची प्रत्येक आघाडी सरकार मध्ये काळजी घेतली आहे त्याचा हा अर्थ आहे. हे सरकार २५ वर्षे टिकणार आहे म्हणे.”, असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जे प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी देण्यात आले आहेत त्यात काँग्रेसच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ९०० कोटी, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या मतदारसंघांसाठी ७०० कोटी तर शिवसेना आमदारांच्या मतदारसंघांसाठी केवळ ३०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. यावरूनच या आमदारांमध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!