Share

‘चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ, त्यांचा अशा गोष्टी करण्यात लौकिक’

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातील नव्या पक्ष कार्यालयाला भेट दिली. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांचा पक्षप्रवेश देखील शरद पवार यांच्या हजेरीत पार पडला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी नेते उपस्थित होते.

पत्रकारांच्या प्रश्नांवर उत्तर देताना शरद पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यानंतर भाजपने आता आपला मोर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे वळवला आहे. या दोघांचीही सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी भाजपने केली आहे. इतकंच नाही तर भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत हा ठराव भाजपने मंजूर केलाय.

यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना शरद पवार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटलांना खोचक टोला लगावला. ‘सामान्य जीवनात अनेक राजकीय पक्षांची आम्ही पाहणी करत असतो. पण एखाद्या पक्षाच्या नेत्यासंबंधी ठराव करून अशी मागणी करण्याचं चित्र यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. पण चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या कधी पाहिल्या गेल्या नाहीत, अशा गोष्टी करण्यात त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन असं काही केलं असेल, तर आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. सत्ता त्यांच्या हातात आहे. या चौकश्या करणाऱ्या यंत्रणा देखील आहेत. आमचे सगळे सहकारी त्यांचं स्वागत करतील,’ असं शरद पवार म्हणाले.

काय आहे हा ठराव ?

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकश अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, असा ठराव भाजपने मंजूर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!