🕒 1 min read
रत्नागिरी : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. आता ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार असून राष्ट्रपती कार्यालयाने देखील त्यांची भेट मंजूर केली आहे. याबाबत संभाजीराजे यांनी एक ट्विट करू माहिती दिली असून सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींच्या भेटीसाठी जाणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान रत्नागिरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना संभाजीराजे आणि राष्ट्रपती यांच्या भेटीबाबतच्या प्रश्नावरून संभाजीराजेंना खोचक टोला लगावलाय. संभाजीराजे हे सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ घेऊन राष्ट्रपतींना मराठा आरक्षणासाठी भेटणार असल्याचा प्रश्न राणेंना केल्यानंतर, ‘त्यांचा नवीन पुढारी बनायचा प्रयत्न आहे,’ असं विधान केलं.
संभाजीराजे यांनी नेमकी काय माहिती दिलीये ?
‘राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी दि. २ सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधीने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत,’ असं संभाजीराजे यांनी काल आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मा. राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती.
त्यानुसार त्यांनी दि २ सप्टें रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे.
यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी १ खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी आज सर्व पक्षाचे अध्यक्ष व गटनेत्यांना पत्र पाठवली आहेत.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 26, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन राऊत शिवसेनेला बुडवणार’; नारायण राणेंच भाकीत
- ‘थोबाड’ प्रकरणात राजकारणी व्यस्त, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही-बाबा आढाव
- जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
- औरंगाबाद काँग्रेसमधील गटा-तटाच्या राजकारणाचा ताळमेळ जमवण्यात नाना पटोले यशस्वी झाले का?
- जंबो कार्यकारिणीतील नविन नियुक्त्यांमुळे पुणे काँग्रेसमध्ये असंतोष उफाळण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
