Share

‘थोबाड’ प्रकरणात राजकारणी व्यस्त, त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही-बाबा आढाव

Published On: 

पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी महामार्गांसाठी होत असलेल्या भूसंपादनाच्या प्रश्नांवर पुण्यात बोलत असतांना राजकारणावर हल्लाबोल केला. ‘राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची यातच अडकले आहेत. त्यांना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही’, असा आरोप देखील त्यांनी केला. तसेच पुनर्वसनात योग्य मोबदला मिळण्यासाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

यावेळी ते म्हणाले की,’राजकारणी कुणाच्या थोबाडीत मारायची याच्यात अडकले आहेत. मात्र, त्यांना रिंगरोडला विरोध होत असताना शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. शेतकऱ्यांची औलाद आहे, एक इंचही जमीन देणार नाही. या आंदोलनाची दखल घेतली नाहीतर, मंत्रालयावर मोर्चा काढू. मंत्र्यांना तालुक्यात फिरू देणार नाही.’ तसेच नितीन गडकरींनी रस्त्यांसाठी भूसंपादन केल्यावर पुनर्वसनासाठी योजना आणायला हवी. त्यांनी गावागावात फिरावे. मी त्यांना सोबत घेऊन फिरेल. यावेळी एकही शेतकरी दगड मारणार नाही याची जबाबदारी मी घेतो अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

दरम्यान, पुणे शहरालगत ६ तालुक्यांमधून रिंग रोड प्रस्तावित आहे. त्याला विरोध करण्यासाठी पुण्यातील विधानभवन येथे बाधित शेतकरी एकत्र आले होते. यावेळी बोलत असतांना बाबा आढाव यांनी राजकीय नेत्यांवर टीकास्त्र सोडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!