Share

जंबो कार्यकारिणीतील नविन नियुक्त्यांमुळे पुणे काँग्रेसमध्ये असंतोष उफाळण्याची शक्यता

Published On: 

🕒 1 min read

पुणे:- काल दिल्लीतून जारी झालेल्या महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या जंबो कार्यकारिणीमुळे पुणे शहर कॉंग्रेसमधील काही नेते मंडळी नाराज झाल्याची चर्चा आहे.  पुणे शहर कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाच्या बदलाबाबत देखील चर्चा रंगल्या होत्या मात्र तसे काहीही घडले नाही. २०१७ साली झालेल्या महापालिका, २०१९ ची लोकसभा व विधानसभा अश्या तीनही निवडणुकात सपाटून मार खावा लागलेल्या पुणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष नक्की बदलले जाणार असे अपेक्षित होते. मात्र तसे काहीही घडले नाही.

अनेक इच्छुकांनी तशी मोर्चेबांधणी देखील केली होती. आगामी महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस नव्या, ताज्या दमाच्या एखाद्या तरुण अध्यक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल असे तर्क लढवले जात असताना हायकमांडने विद्यमान शहराध्याक्षांवर विश्वास दाखवल्यामुळे अनेक इच्छुकांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे.

दुसऱ्या बाजूला प्रदेश कॉंग्रेसने जारी केलेल्या यादीत अजित आपटे यांना थेट प्रदेश सरचिटणीस करण्यात आले आहे. आपटे हे गेली अनेक वर्षे म्हणावे तितके कॉंग्रेस पक्षात सक्रिय नसताना देखील त्यांची प्रदेश पातळीवर नियुक्ती झाल्याने शिवाजीनगर मतदारसंघासह संपुर्ण पुणे कॉंग्रेसमधील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, गोपाळ तिवारी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला व प्रदेश प्रवक्त्याला प्रवक्ते पदावरून हटवून त्यांना दुय्यम दर्जाचे सचिवपद देण्यात आले आहे. पुण्यातून अभय छाजेड, रोहित टिळक हे प्रदेश सरचिटणीसपदी तर माजी आमदार अनंत गाडगीळ प्रवक्तेपदी कायम राहिले असले तरी अनेक सक्रिय कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा असताना संधी न मिळाल्याने कॉंग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत अशी कुजबुज सुरु आहे.

कॉंग्रेसची पुणे शहरात झालेली वाताहत व आगामी महापालिका निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून नविन कार्यकारणी तयार करण्याची गरज असतांना उलट अनपेक्षित बदल केल्याने कॉंग्रेस हायकमांडची डोकेदुखी वाढणार आहे. तसेच महापालिका निवडणुकीत दोन अंकी नगरसेवक निवडून आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पुणे कॉंग्रेसला नवीन कार्यकारणीमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा पक्षांतरचा जोरदार फटका बसू शकतो अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!