Share

‘दोन राऊत शिवसेनेला बुडवणार’; नारायण राणेंच भाकीत

Published On: 

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांना अटक झाल्यामुळे त्यांची जनआशीर्वाद यात्रा स्थगित झाली होती. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा राणे जनतेचा आशीर्वाद मागायला जात आहे. या यात्रेमध्ये राणे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचा लक्ष लागलं आहे.

दरम्यान, रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार विनायक राऊत यांच्या टीकेचा चांगलाच समाचार घेतला. ‘मी जेव्हा भाजपात आलो तेव्हा भाजपची विचारधारा स्वीकारूनच पक्षात आलो. आम्ही ओरिजिनल असो नसो भाजपला परवडतोय. संजय राऊत संपादक म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. ते फक्त बोलायच्या कामासाठी ठेवलेत. हे दोन राऊत शिवसेनेला बुडवणार,’ अशी खोचक टीका नारायण राणे यांनी रत्नागिरीमध्ये पत्रकारांशी बोलताना केली आहे.

संजय राऊत यांनी काय टीका केली होती ?

‘भाजप पक्षात बाहेरून आलेल्या काही व्यक्तींमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. ते भाजपचे ओरिजिनल नाहीत, शिवसेनेबाबत असं भाजपचे मूळ नेते बोलूच शकत नाहीत. पंतप्रधानांनी जनआशीर्वाद यात्रा नव्या मंत्र्यांकडून सरकारच्या कार्यक्रमांची माहीती देण्यासाठी काढायला सांगितली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चिखलफेक करायला नाही. याचा अर्थ ते मोदी यांच्या आदेशाचे पालन करत नाहीत,’ अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!