नांदेड : केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले.
नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँग मार्च काढण्यात आला. यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “केंद्रातील सरकार, ‘हम करोसे कायदा, आम्हाला वाटेल ते नियम करु’ अशा हुकुमशाही प्रवृत्तीतून त्यानी लोकसभा व राज्यसभेत हे कायदे मंजूर केले आहेत. अशा कायद्याच्या माध्यमातून देशाची लुट करायचे काम सहा वर्षापासून सुरु आहे. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लुटले तशाच पद्धतीने आता भाजपाच्या रुपाने व्यापारी देशाला लुटत आहेत.”
दरम्यान, काँग्रेसने आज राज्यभरात केंद्र सरकार विरोधात आक्रमकर भूमिका घेत आंदोलन केले असून त्यात हाथरस प्रकरणासह कृषी विधेयक व कामगार कायद्याला देखील विरोध केला आहे. तर मुंबईमधील आंदोलनात, ‘नवीन कृषी कायदे आणून शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील काँग्रसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.’
महत्वाच्या बातम्या
- ‘मी बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो, चंद्रकांत पाटलांना विस्मरण झालं असेल’ ; शरद पवारांचा पलटवार
- बंडखोरी दाबून ठेवली तर स्फोट होतो; खा.विखेंच्या विधानाने उलट सुलट चर्चांना उधाण
- शरद पवारांची सिरमला भेट, म्हणाले मी लस घेतली…
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

