Share

शरद पवारांची सिरमला भेट, म्हणाले मी लस घेतली…

Published On: 

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पाबाबत सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गेले ६ महिने थैमान घातलेल्या कोरोनाच्या लसीवरून सिरम इन्स्टिट्यूटकडे सद्या देशाच्या जनतेचं लक्ष लागलं आहे. अशातच शरद पवारांनी सिरमला भेट दिल्यामुळे त्यांनी लस घेतल्याच्या वृत्तांना उधाण आले होते.

यावर खुद्द शरद पवारांनी खुलासा केला आहे. मी सिरममध्ये जाऊन कोरोनाची लस घेतल्याचे वृत्त चुकीचे आहे. मी कोरोनाची लस घेतलेली नाही. सिरममध्ये जाऊन मी रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याची लस घेतली. मी इम्युनिटी वाढविण्याची लस घेतल्याचे यावेळी पवारांनी सांगितले. त्यामुळे मी कोरोनाची लस घेतल्याचे लोक म्हणतात ते खरं नाही. यावेळी पत्रकारांमध्ये देखील हशा पिकला.

मी इतकं लोकांमध्ये फिरतो..मिसळतो…प्रतिकारशक्ती वाढायला हवी म्हणून मी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी लस घेतल्याचे ते म्हणाले. कोरोनाची लस यायला अजून जानेवारी उजाडेल असा खुलासा देखील त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!