अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर दक्षिणचे भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील हे आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. माझा स्वभाव थोडा वेगळा आहे. मी मूळचा बंडखोर आहे. कुठल्याच पक्षात ॲडजेस्ट होण्याचा माझा स्वभाव नाही. सध्या भाजपमध्येही मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय. बंडखोरी जास्त काळ दाबून ठेवली तर त्याचा स्फोट होतो, असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे. पारनेर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच यावेळी त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनाही खडेबोल सुनावले.
खा.विखे पुढे म्हणाले की, लोकांना वाटते की मी उद्धटपणे बोलतो. माझे वडील आ.राधाकृष्ण विखे पाटील देखील असेच म्हणतात. मग असा असेल तर लोक मला मते कशी देतात? मी सत्य तेच बोलतो. कधी लाचारी स्वीकारीत नाही.
वेळ काढू पणा करीत नाही. जे होणार नाही, त्याची खोटी आश्वासने देत नाही. वास्तविक पहाता मी पारदर्शक माणूस आहे. माझ्या स्वभावाचा हळूहळू तुम्हाला अंदाज येईल. पदाचा मोह मला नाही. मी कोण आहे, माझे वडील काय आहेत, माझे आजोबा काय होते, याचा माझ्या वागण्यावर काहीच परिणाम होत नाही, असे खा.विखे म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष मुंडे यांना खा.विखे यांनी सल्ला दिला. ते म्हणाले, आपण सर्वजण पक्षावरच लक्ष केंद्रित करू. संघटनेसाठी मला जेवढे परवडेल तेवढे मी देईन. परवडेल याचा अर्थ समजून घ्या. ज्यावेळी मला परवडणार नाही, त्यावेळी जिल्ह्यातील निवडणुका संपून जातील. पक्षवाढीसाठी तुम्ही संकल्पना द्या. मी त्यासाठी मदत करतो. माझे आजोबा होते तेव्हा त्यांचे कार्यकर्ते फाटके तुटके होते. कोणी वाळू तस्कर नव्हते.
गळ्यात सोन्याची चैन आणि सफारी घालणारे नव्हते. तरीही माझे आजोबा स्व.बाळासाहेब विखे पाटील राजकारणात मोठे झाले. म्हणून आपल्याकडेही गाड्याघोडेवाले नाहीत.सर्वसामान्य माणसांसाठी मी आहे. वाळू तस्करांच्या गाड्या सोडण्यासाठी नाही. अवैध धंद्याना संरक्षण मिळण्याच्या अपेक्षेने माझ्याकडे येऊ नका. अशा शब्दांत खा.विखे यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.
महत्वाच्या बातम्या :-
- शिवसेनेचा वचननामा ही तर जनतेची फसवणूक : आपची पोलिसात तक्रार
- दरेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
- ‘माणुसकी म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची ही भूमिका घृणास्पद आहे’ : शरद पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

