Share

उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर

Published On: 

मुंबई- उत्तर प्रदेशातील हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी हाथरस येथे निघालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व त्यांना अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दांत निषेध करून पीडितेला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष संघर्ष करत राहील,असा इशारा महाराष्ट्र कॉंग्रेसने दिला आहे.

उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत. अत्याचार झाल्यावर कोणी विचारणा करण्यास गेल्यावर आडकाठी होते. त्या मुलीवर जीवंतपणी अत्याचार झाला आणि मृत्युंनंतर तिच्या परिवाराला अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. हे सर्व मानवतेच्या नियमांमध्ये कुठेच बसताना दिसत नाही, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अँड. यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

तर दुसऱ्या बाजूला देशात अराजक माजलं आहे. उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मुली सुरक्षित नाहीत. यूपीत कायद्याचं राज्य नाही. दडपशाही सुरू आहे, असं सुनावतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याबाबत जे घडलं ते दुर्देवी असून योगी आदित्यनाथ सरकारने या प्रकाराबद्दल स्वत:ची चूक कबूल करावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी देखील या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस कार्यकर्तेही भाजप नेत्यांची कॉलर धरू शकतात. तेवढी ताकद त्यांच्यात आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आमच्या नेत्यांनी आम्हाला तशी शिकवण दिलेली नाही. आम्ही गांधी विचारधारेवर विश्वास ठेवून लोकशाही मार्गाने काम करणारी मंडळी आहोत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!