🕒 1 min read
नवी दिल्ली- हाथरस प्रकरणाबाबत देशात तीव्र संताप वाढला चालला आहे. या प्रकरणावरून योगी सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. योगी सरकारने कुणाच्या आड लपून राजकारण करणे थांबवून आणि ज्या ठिकाणी आपले सरकार आहे, तिथेली माता भगिनींना सुरक्षित वातावरण दिले तर ते अधिक गरजेचं राहिल, असा सल्ला विरोधक आता भाजपला देऊ लागले आहेत.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी हाथरस सामूहिक बलात्कारासारख्या घटनांना बेरोजगारी जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.काटजू यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर आता टीका देखील होत आहे.
पुरुषांमध्ये शारीरिक संबंधांची नैसर्गिकरित्या तीव्र इच्छा असते. पण बेरोजगारी आहे आणि ती वाढत जात आहे. त्यामुळे तरूणांचे विवाह होत नाहीत. यामुळेच सामान्य गरज असलेल्या वयात येऊनदेखील मोठ्या प्रमाणात तरूण शारीरिक गरजेपासून वंचित राहतात, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलं आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचा मी निषेध करतो आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याचंही मी आवाहन करतो, असं मार्कंडेय काटजू यांनी म्हटलंय.
“आपण बलात्काराच्या घटनेला योग्य ठरवत नाही तर त्याचा निषेधच करत आहोत. परंतु आज देशात जी परिस्थितीत आहे त्यावरून त्या वाढणं हे निश्चितच आहे. जर देशात अशा घटना कमी करायच्या असतील तर सामाजाकि आणि आर्थित व्यवस्था अशी करावी लागेल ज्याठिकाणी बेरोजगारी अतिशय कमी असेल,” असंही काटजू यांनी नमूद केलं.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात युवा सेना नेत्याची तीक्ष्ण हत्यारांनी वार करून हत्या
- मित्रा डोनाल्ड,लवकर बरा हो….’; मोदींनी दिल्या ट्रम्प यांना शुभेच्छा
- दरेकरांच्या अडचणी वाढल्या, मुंबई बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश
- विवेक रहाडे यांच्या कुटुंबियांची नरेंद्र पाटील यांनी घेतली भेट,पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले
- महिला सशक्तीकरणासाठी भारताचे कायदे सशक्त आणि सक्षम आहेत : स्मृती इराणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
