पुणे : राज्यात सद्या मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज देखील रस्त्यावर उतरताना दिसत आहे.
तर, आरक्षणाच्या वादावरून नेत्यांचे आरोप -प्रत्यारोप देखील सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, ‘दोन्ही छत्रपती भाजपचे खासदार आहेत त्यामुळे त्यांनी केंद्रात जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवून घ्यावा’ असे वक्तव्य केले होते. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. ‘आरक्षण केंद्रातून मिळत नाही, हा त्या-त्या राज्याचा विषय असतो’ असे ते म्हणाले.
‘राजकारणात ५० वर्षे असणाऱ्या शरद पवार यांना माहिती कमी आहे असे मी म्हणणार नाही. पवार यांच्याविषयी माझ्या मनात नेगमीच आदर राहिला आहे, परंतु अधूनमधून ते जी विधाने करतात ती मुद्दाम करतात की, त्यांचे ते अज्ञान आहे हेच कळत नाही’ असा टोला देखील चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
मी जे बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो- शरद पवार
शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी विविध प्रकल्पाबाबत सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. ‘राज्यात फडणवीसांचे सरकार असताना चंद्रकांतदादा हे देखील मंत्री होते. त्यावेळी विधानसभेमध्ये एकमताने आरक्षण देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तो ठराव पस केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.’
‘त्यामुळे हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेल्याने केंद्राच्या विधी तज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. आरक्षणाचा ठराव महाराष्ट्र सरकारने आधीच मंजूर केल्याने तो आता महाराष्ट्र सरकारकडे नाही, तो राज्याच्या उच्च न्यायालयात स्थगित झालेला नाही, याच विस्मरण कदाचित चंद्रकांत पाटील यांना पडला असावा. त्यामुळे त्यांना वाटतं की मी असं का बोलतो? पण मी जे बोलतो ते विचारपूर्वकच बोलतो’ असं प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- #हाथरस प्रकरणी अखेर योगी आदित्यनाथ यांनी सोडले मौन, म्हणाले…
- ‘माणुसकी म्हणून सुद्धा उत्तर प्रदेश सरकारची ही भूमिका घृणास्पद आहे’ : शरद पवार
- दिलासादायक : कोरोना रुग्ण बरे होण्यामध्ये भारत जगामध्ये अव्वल
- मार्कंडेय काटजूंचे वादग्रस्त वक्तव्य; हाथरस प्रकरणाचं फोडलं बेरोजगारीवर खापर
- उत्तर प्रदेशातील गुंडा राजमध्ये महिला सुरक्षित नाहीत- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

