Share

“इतिहास विसरून हे लोक बोलतात आणि…”, फडणवीसांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aditya Thackeray) प्रचार करण्यासाठी गोव्यात पोहोचले असून याच पार्श्वभूमीवर काल(१२ फेब्रु.)आदित्य ठाकरे यांनी पणजीमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली. तसेच भाजपचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही आजपर्यंत राज्याबाहेर इतर ठिकाणी उमेदवार उभे केले नाहीत, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. दरम्यान, आदित्य यांच्या या वक्तव्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात एका मुलाखतीत बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘आदित्य यांना इतिहास माहिती नसून यापूर्वी भाजप सोबत असताना पूर्ण ताकदीनिशी शिवसेना गोव्यात उतरली होती. परंतु गोव्याने प्रत्येक वेळी शिवसेनेला नाकारले. अशी कोणती निवडणूक आहे जिथे भाजप लढतंय म्हणून ते लढले नाहीत?’, असा सवालही फडणवीसांनी केला. तसेच मागील २०-२५ वर्ष हे लोक लढत आहेत. परंतु त्यांचे डिपॉझिट कधीच वाचत नाही. इतिहास विसरून हे लोक बोलतात’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले होते की,‘आमची जेव्हा भाजपसोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. परंतु मागील ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. हेच एनडीएतील इतर पक्षांसोबतही झाले’, असे आदित्य म्हणाले.

 महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!